Welcome to Orgonatural

ORGO-NATURAL is a team of persons, concerned about welfare of farmers, consumers, and the ecosystems as whole.
Let us see how each of us is presently affected in our daily life.

Farmers: We all know or at least heard that farmers are in distress. Study of the root cause reveals that since beginning this business was at the mercy of nature. It was rather humane extension of nature.
Nourishment of all concerned was the main motive. In India it evolved during Vedic times when the ecosystem was at peak equilibrium. The sacred sustainable approach, it flourished for thousands of years. It took rural agrarian economy and civilization to a great height. On this strength it persisted almost thousand years of foreign invasions of many kinds. The British rule could finally break it. But this was not just political defeat. The exploitative industrial thought behind colonial rule was rooted and took stronghold of mindset. It was defeat of eco-sensitive and sustainable culture. Post-independence, industrial policy and the green revolution (the industrial thought in Agriculture) further aggravated the situation. First it was nature, then the rulers followed by unruly market forces and now all three of them have gripped the fate of farmers.

banner

Can market and technology driven farming sustain our ever increasing wants?
Consumers: As consumers we are now slaves of industry and market. We are forced to consume what industry wants to offer in the market. It is taking its toll on all the aspects of our health. We all invest ourselves in our profession to earn money with great effort, only to lose it on medicine for much longer period of time. Our lifestyle is going against nature and the food that we are consuming is not nourishing us properly to cope up with the predicaments of modern life.

Can we look to our farmers for providing us wholesome nourishment?
Market: Though farmers in the beginning, we now farm by proxy without knowing each other. In the modern world created by industrial revolution the farmer needs money only to buy goods and services. The system deals with the farmer only on its own term, both at the time of buying or selling. Farmer producing for his anonymous buyer is some distant markets fail miserably by getting below cost rates due to bumper crop. Otherwise he is left with nothing surplus in adverse conditions. And as soon as he is finished with his stock, market rises. On the other hand consumer ends up paying extra cost in term of price or poor, poison filled food.

Can market become farmer and consumer friendly at the same time? Environment: Already detached from nature, consumer treats it like luxury to be bought again with money. Even the farmer who is the custodian of local ecology is no more concerned being driven by market forces.

Can farming is possible, profitable when environmental conditions are degraded? Current efforts projected by research scientists, Mediators, industry and politicians are only encashing farmer’s problems for their petty ulterior motives. Offering loans, loan wavers and meager shortsighted packages will never solve the real problem. Giving so called remunerative prices based on cost of production is difficult task. Even If managed it will only protect farm input side that is industry and market. Effect of any increase in the price of farm produce will be marred by corresponding increase in input use or cost. It will inculcate greed and result in greater frustration.

There is lot of education, communication required at both ends. There is need to support each other and create a harmonious ‘win-win’ situation.

Here groups like ORGO Naturals come into picture. By charging a very low margin we are trying to connect sensitive, dedicated consumers with dedicated growers following sustainable farming practices. We aim to offer poison free food of good nutritive value at competitive price to consumers and pass maximum share of it to the farmers.

ORGO-NATURAL is a team of concerned persons. Concerned about welfare of farmers, consumers, and the ecosystems as whole. One can visualize it as a tree. The farmers are its roots. The Orgo-natural core team is like a trunk. The sales outlets are the branches. Consumers are the leaves and some more committed customers are its flowers. The satisfaction of all parts is the fruit of this wholistic venture. This and any such events are part of our effort to bridge the gap, the divide, the invisible wall between consumers and producer.

Testimonial

why choose us

  • img

    Quality

  • img

    Healthy

  • img

    Fresh

img

संकल्पना

ओर्गो-नॅचरल हा शेती, ग्राहकहित व पर्यावरण याबाबत जागरुक व्यक्तींच्या सामुहिक प्रयत्नाने आकार घेत असलेला ब्रँड आहे. हयाचे महत्व समजण्यासाठी सध्या विविध घटकांच्या जीवनातील वास्तव पाहू.

शेतकरी: आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले नसले तरी किमान ऐकून माहीत असावे कि आज शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे. चार पिढ्या आधी मात्र ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ हा वाक्यप्रचार प्रचलित होता. ही परिस्थिती इतकी उलट होण्याच्या कारणांचा शोध घेता असे आढळते की सुरुवातीपासूनच हा व्यवसाय निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होता. किंबहुना शेती निसर्गाचेच एक मानवी प्रारूप आहे. सर्व संबंधित जीवांचे पोषण हा त्यामागील मूळ हेतू. कृषी संस्कृती व ग्रामीण अर्थव्यवस्था भारतात वेदिक कालापासून जेव्हा निसर्गव्यवस्था पराकोटीची समृध्द होती तेव्हा विकसित झाली. त्यातील निसर्गस्नेही शाश्वत जीवन मुल्यांमुळे हजारो वर्षे समृध्द राहिली. गेली जवळजवळ एक हजार वर्षे विविध प्रकारच्या परचक्रांचे आघात सोसूनही टिकली. इंग्रजांच्या वसाहतवादी राजवटीने तिचा पाडाव केला. ही हार केवळ राजकीय नसून वसाहतवादी राजवटीने रुजवलेला शोषक दृष्टीकोन येथे रुजून आज सर्वांच्या जीवनाचा स्थायीभाव बनला ही आहे. त्यामुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेने निर्माण केलेल्या समृद्धीचा ऱ्हास झाला. स्वातंत्रप्राप्तीनंतर स्वीकारलेल्या औद्योगिक विकासनीतीने व तिच्यावर आधारित हरितक्रांतीने शेतीची दुरावस्था अधिकच वाढवली. आधी निसर्ग, मग शासनयंत्रणा आणि आता शोषक भ्रामक बाजारव्यवस्था ह्या तिघांनी मिळून शेती व्यवसायाचा गळा आवळला आहे.

बाजारव्यवस्था व तंत्रज्ञानावर आधारित शेती, मानवाच्या स्फोटक प्रमाणात वाढणाऱ्या कोणत्या गरजांना तोंड देऊ शकेल?
ग्राहक: ग्राहक आज उद्योग व बाजारव्यवस्थेचा गुलाम झाला आहे. महाकाय उद्योगांनी केवळ स्वतःच्या आर्थिक फायदयाचा विचार करून बनवलेल्या वस्तू (आता अन्नही) बाजारातून घेणे एवढेच आज आमच्या हाती आहे. ग्राहक ह्या व्यवस्थेत स्वत:च्या आरोग्याचा विचारही नं करता सुखाच्या कल्पनेमागे आपले सर्वस्व पणाला लावून धावत रहातो. आपली निसर्गविरोधी जीवनशैली जपत वाढलेले आयुष्य शेवटी औषध गोळ्यावर काढतो. आज आपण खात असलेले अन्न आरोग्य राखण्यास व जीवनातील वाढते ताण तणाव सोसण्याचे बळ देण्यास अपुरे पडत आहे. काय शेतकरी असे अन्न रास्त दरात मला पुरवू शकतील?

बाजार व्यवस्था: जीवनावश्यक गरजा बाजारातून घेणारा ग्राहक दुसऱ्याकरवी अप्रत्यक्षपणे शेती करत असतो. एकमेकांना त्याची माहिती नाही एवढेच. एका बाजूला कुठल्यातरी बाजारातून वस्तू घेणाऱ्या आपल्या ह्या अज्ञात ग्राहकासाठी शेती पिकवणारा शेतकरी कधी जास्त उत्पादनाने भाव कोसळून तर कधी अनेक कारणाने उत्पादन नं आल्याने कायम नुकसानीत आहे. दुसरीकडे ग्राहक त्यासाठी नेहमीच जास्त दाम मोजत आहे. कधी किमतीच्या रूपाने तर कधी निकृष्ट दर्जा व विविध रसायनांच्या विषयुक्त भेसळीने खालावणाऱ्या आरोग्याच्या रूपाने.

बाजारव्यवस्था एकाचवेळी ग्राहक व शेतकरी स्नेही होऊ शकेल?
पर्यावरण: शेती हा निसर्गाचाच मानवी अविष्कार आहे असे सुरुवातीलाच म्हणले. ह्यापासून आधीच तुटलेला ग्राहक निसर्गसानिध्य खूप पैसे मोजून मिळवण्याची एक चैन समजतो. पण शेतकऱ्याला आपण स्थानिक पर्यावरणाचे विश्वस्त आहोत व त्याच्या रक्षणातच माझ्या शेतीची व जीवनाची शाश्वती आहे ह्याची कल्पना आहे का? हा दृष्टीकोण तो त्याच्या कामात, विचारात ठेवतो का?

निसर्ग व पर्यावरणाच्या विचाराशिवाय शेती शाश्वत वा तत्कालीन फायद्याची होऊ शकेल का?
सध्या शास्त्रज्ञ, उद्योगविश्व, राजकीय व सामाजिक नेतृत्व शेतीच्या प्रश्नांकडे फक्त स्वत:च्या फायद्यापुरते पहातात. कर्ज व कर्जमाफी, तात्पुरत्या आर्थिक मदतीचे पॅकेज ह्या उपाययोजना प्रश्न सोडवण्याऐवजी शेती व शेतकऱ्याला अधिकच परावलंबी बनवत आहे. देशपातळीवर उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव ठरवणे अत्यंत अवघड आहे. ते ठरले तरी त्यामुळे शेतीच्या निविष्ठांचा वापर व किमती वाढून त्या पुरवणाऱ्या उद्योगांच्या फायद्याला संरक्षण व पुष्टी मिळणार आहे. सर्वच घटकात लोभ व शेतकऱ्यांच्या जीवनात भ्रमनिरास वाढणार आहे. ह्याबाबत मोठ्या प्रमाणावर शिक्षण, जागृती व परस्पर संवाद वाढवून सर्वांसाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करावी लागणार आहे.

इथे ओर्गो-नॅचरलसारख्या गटाची गरज दिसते. रास्त फायद्यावर काम करून, जागरूक ग्राहकांना शाश्वत शेतीपद्धतींचा अवलंब करून विविध उत्पादने निर्माण करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांशी जोडून देण्याचे काम निरंतर करत रहावे लागणार आहे. त्यादृष्टीने विषमुक्त अन्न शहरातील ग्राहकांना पुरवून ते देत असलेल्या मोबदल्यातील जास्तीत जास्त वाटा उत्पादकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ओर्गो-नॅचरलने हाती घेतले आहे. ओर्गो-नॅचरल शेतकरी, ग्राहक व पर्यावरण ह्या तिन्ही घटकाच्या संवर्धनाच्या विचारांशी बांधील राहून काम करणारा गट आहे. त्याचे स्वरूप समजण्यासाठी एखाद्या वृक्षाचे चित्र डोळ्यासमोर आणू. शेतकरी ह्या वृक्षाची मुळे आहेत. मुख्य प्रवर्तक त्या वृक्षाचे खोड आहे. विविध विक्रीकेंद्रे त्याच्या शाखा आहेत. सर्वसामान्य ग्राहक त्याची पाने तर जागरूक संवेदनशील ग्राहक त्याची फुले आहेत. सर्व घटकांचे एकत्रित समाधानी, आनंददायी सहअस्तित्व हे ह्या सर्व उपक्रमाचे फलस्वरूप आहे.

चालू तसेच भावी ‘शेतकरी व ग्राहक मेळावे’ म्हणजे, उत्पादक व ग्राहक ह्यांच्यातील अज्ञानरुपी दरी पार करून भौतिक, मानसिक व वैचारिक भेद दूर करण्याचा प्रयत्न आहे.